Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा व संघटन मजबूत करा-विक्रम देशमुख

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा व संघटन मजबूत करा असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी विक्रम देशमुख यांनी केले.
भारतीय जनता पार्टीची शेलगाव भाळवणी ता .करमाळा हॉटेल शिवम प्राइड येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बूथ स्तरापासून केंद्रस्तरापर्यंत शत: प्रतिशत भाजप करण्यासाठी आपण संघटन पर्वच्या काळातील सर्व केंद्रस्तरावरील उपक्रम ग्रामीण स्तरापर्यंत राबवावेत . सक्रिय सदस्य ,प्राथमिक सदस्य, नोंदणी बूथ समित्या गठीत करणे व आगामी मंडल अध्यक्ष व मंडलातील सर्व आघाड्या मोर्चाच्या निवडीमध्ये चांगल्या नेतृत्वांना संधी देण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. यावेळी सोलापूर जिल्हा ग्रामीण पश्चिमचे अध्यक्ष चेतन सिंह केदार ,जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे ,किसान मोर्चाच्या प्रदेशाची दीपक चव्हाण करमाळा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सचिन पिसाळ कुर्डूवाडी मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोरे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार जिल्हा सचिव लक्ष्मण केकान श्याम सिंधी माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन अमोल कुलकर्णी संजय घोरपडे मार्केट कमिटी संचालक काशिनाथ काकडे, कुलदीप पाटील, रंगनाथ शिंदे तसेच मकाई संचालक आशिष गायकवाड, युवराज रोकडे, महेश तळेकर, गणेश तळेकर, रामभाऊ शिंदे, महावीर तळेकर व सुनंदा भगत कुर्डूवाडी मंडल सरचिटणीस अमोल गायकवाड कुर्डूवाडी शहराध्यक्ष अतुल फरतडे महिला मोर्चा मंडल अध्यक्ष प्रतीक्षा गोपणे युवा मोर्चा जिल्हा सचिव हरीश घोणे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी गायकवाड कुर्डूवाडी शहर युवा मोर्चा सागर तरंगे इतर महिला पदाधिकारी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी करमाळातून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सक्रिय सदस्य तसेच बूथ समित्या गठीत करून जिल्ह्यात सगळ्यात चांगलं काम करणारअशी ग्वाही करमाळा मंडल चे अध्यक्ष सचिन पिसाळ यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक दीपक चव्हाण यांनी केले तसेच सूत्रसंचालन विजयसिंह ओहळ व आभार सचिन पिसाळ यांनी मांडले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group