करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी झोळ परिवाराकडून 31 उमेदवारी अर्ज दाखल.

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 30 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वामध्ये एकूण दहा गटापैकी सर्वच गटांमध्ये 31उमेदवारी अर्ज भरून पूर्ण पॅनल तयार केला आहे. सहकार टिकला पाहिजे, शेतकरी सभासदांना कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून योग्य न्याय दिला पाहिजे, तालुक्यातील ऊस तालुक्यातच गाळप झाला पाहिजे, या उद्देशाने झोळ सर यांनी पॅनल उभा केला आहे. परंतु विविध गटातून कारखान्यासाठी स्वनिधी टाकणारे उमेदवार एकत्र येणार असतील तर आम्ही कारखाना बिनविरोध करण्यासाठी तयार आहोत. सर्वच राजकीय गटाने मिळून 273 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अतिशय प्रचंड प्रतिसाद संचालक होण्यासाठी दिसून येत आहे हाच प्रतिसाद जर सर्वांनी आदिनाथ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व सहकार तत्वावर चालण्यासाठी दाखवला तर नक्कीच आदिनाथ कारखान्याला चांगले दिवस येतील. शेतकऱ्यांचे मंदिर असलेला आदिनाथ अडचणीतून बाहेर निघावा ही आमची मनोमन इच्छा आहे. ऊस आपल्या तालुक्यात पिकला जातो आणि गाळपासाठी इतर तालुक्यात जातो याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. इतर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे आदिनाथ कारखाना चांगल्या पद्धतीने ऊस गाळप करू शकतो असे झोळ सर यांनी सांगितले. तसेच अडचणीत असलेला साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढून त्याला गत्तवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असेही यावेळी झोळ सर यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group