मनसेच्या गुढीपाडवा मुंबई येथील मेळाव्यास करमाळ्यातुन शेकडो मनसैनिक जाणार- संजय (बापु) घोलप
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्या मेळाव्यास मोठ्या संख्येने करमाळा तालुक्यातील मनसैनिक जाणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप यांनी सांगितले आहे.मुबई येथील मेळाव्यास करमाळा तालुक्यातुन मा.राजसाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा.दिलिप बापु धोत्रे मनसे नेते मा.प्रशांत गिड्डे जिल्हाध्यक्ष मनसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुबई छत्रपती शिवाजीपार्क येथे मनसे गुढीपाडवा मेळाव्यास मोठ्या संख्येने मनसैनिक व पदाधिकाऱ्यांसह जाणार असल्याने करमाळा तालुक्यातील मनसैनिक मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
