करमाळा

करमाळा तालुक्यातील विकासकामासाठी गणेश भाऊ चिवटे यांचा निवेदनाद्वारे पुढाकार प्रलंबित विकासकामे करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवचन

करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेतली करमाळा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निवेदन दिले, या निवेदनात चिवटे यांनी मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीसह, करमाळा तालुक्यातील MIDC ला निधी मंजूर करून तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी तसेच कुकडी, दहिगाव योजना इत्यादी मुद्दे त्यांनी मांडले, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवत लवकर हि कामे मार्गी लाऊ असे आश्वासन दिले. अशी माहिती सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली आहे.
आपण कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी करमाळा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group