महाराष्ट्रातील जनता काॅग्रेंसच्या पाठीशी उभी राहणार तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांचे प्रतिपादन
करमाळा प्रतिनिधी संपुर्ण महाराष्ट्रात खुनशी प्रवृत्तीचे राजकारण सुरु असताना महाराष्ट्रातील जनता आता या गोष्टीला कंटाळलेली असुन पुन्हा एकदा आमदार प्रणितीताई शिंदे, जिल्हाध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहीते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकत वाढल्याशिवाय रहाणार नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी सावडी येथे केले.ते सावडी ता.करमाळा येथिल काँग्रेस पक्षाच्या शाखा उद्घाटना निमित्ताने बोलत होते.पुढे बोलताना श्री जगताप म्हणाले कि स्व.नामदेवराव जगताप यांनी त्यांची संपुर्ण हयात काँग्रेस पक्षवाढीसाठी घालवली.त्यांचा संपुर्ण महाराष्ट्रात वेगळाच दबदबा होता.परंतु त्यानंतर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे नामोनिशान राहिले नाही.केवळ मिठा सारखा वापर केला गेला.परंतु यापुढे काँग्रेस पक्षाचे विचार आपण सर्वांनी समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवुन काँग्रेस पक्षाची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, अल्पसंख्यांक सेल चे तालुकाध्यक्ष दस्तगीरभाई पठाण,ओ.बी.सी सेलचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख,यांचा सत्कार सावडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष दस्तगीर पठाण, ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख,तालुका सरचिटणीस संभाजी शिंदे, विलास पाटील,बाबुराव एकाड-पाटील , माजी सरपंच श्रीमंत शिंदे,सुजय जगताप,योगेश राखुंडे, अमोल पवार, सचिन दहीदुले,गणेश फलफले,सचिन कटारिया,नितीन चोपडे, महेश गोसावी,उपस्थित होते.यावेळी संभाजी शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावडी शाखा अध्यक्ष अक्षय शिंदे,उपाध्यक्ष मयुर काळे,सचिव रोहन शिंदे,सहसचिव बाळासाहेब ठेंबे,खजिनदार शहाजी शेळके,सहखजिनदार गणेश भोसले,प्रसिध्दी प्रमुख महादेव शेलार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.तद्नंतर तालुका सरचिटणीस संभाजी शिंदे यांच्या निवासस्थानी बैठकीचे नियोजन करण्यात आले.
