करमाळा

कर्जदाराला सोडून जामीनदारावर कारवाई करणाऱ्या अर्बन बँकेच्या प्रशासकाविरुद्ध प्रदीप शिंदे गजानन राक्षे यांचे उपोषण

 करमाळा प्रतिनिधी करमाळा अर्बन बँकेने कर्जदाराला सोडून आम्हा जामीनदाराचे खाते बंद केल्याने पगार  पेन्शन येणे बंद झाल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने प्रदीप शिंदे व गजानन राक्षे हे सहाय्यक निबंधक कार्यालय करमाळा येथे स उपोषणास बसले आहेत  करमाळा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप शिंदे व त्यांचे सहकारी सध्या नगरपालिकेत नोकरी करत असलेले राक्षे हे दोघेही नगरपालिकेतील कर्मचारी मित्राला 2018 साली घर बांधणी कर्जाला जामीन झाले होते सदर मित्रांनी कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने कर्जाची रक्कम दुप्पट झाली आहे  गजानन राक्षे  प्रदीप शिंदे जामीनदार असल्याने यांची खाते बंद करण्यात आले आहे त्यामुळे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याची शिंदे व राक्षे यांनी सांगितले आहे याबाबत करमाळा अर्बन बँकेच्या प्रशासकाकडुन आमच्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे सदर प्रकरणी आपण कर्जदाराकडून रक्कम वसूल करावी असे आम्ही सहाय्यक निबंधक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे तरी आमच्या कुटुंबावर आलेली उपासमार थांबवावी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सहायक निबंधक कार्यालय कचेरी येथे आम्ही सपत्नीक उपोषणास बसणार असल्याची त्यांनी म्हटले आहे तरी याबाबत सहायक निबंधक अर्बन बँक यांनी समन्वयाची भूमिका घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी गजानन राक्षे  प्रदीप शिंदे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group