दत्तकला आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्याचे तायक्वांदो स्पर्धेत यश
करमाळा प्रतिनिधी दत्तकला आयडियल स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज केत्तुर १ चा इयत्ता ९ वीतील विद्यार्थी गोविंद गोरख पाखरे या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले आहे.या यशाबद्दल त्याचे वडिल गोरख पाखरे यांनी सांगितले की, गोविंद ला खेळाची खूपच आवड आहे.त्याला आवडणारे क्षेत्र हे खेळ आहे, म्हणून त्याला त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.तसेच पुढील स्पर्धेसाठी त्याची पंजाब साठी निवड झाली आहे.
गोविंदच्या यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रा.रामदास झोळ सर व सचिव प्रा.माया झोळ मॅडम, स्कूलच्या संचालिका नंदा ताटे व प्राचार्य विजय मारकड यांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
