घारगावच्या विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित
करमाळा प्रतिनिधी
घारगाव येथील विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना स्वप्नल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार आज दिनांक १७/३/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे महानगरपालिका डॉ आंबेडकर रोड मालधक्का चौक मंगळवार पेठ पुणे या ठिकाणी सन्मानित करण्यात आले
स्वप्निल फाउंडेशन च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाज दूतांना सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कला क्रीडा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणाऱ्या समाज धुतांना राज्यस्तरीय गुनिजन गौरव पुरस्कार दिला जातो
मा पोलीस अधिकारी मा. भानुप्रताप बर्गे साहेब संदीप राक्षे बाळकृष्ण नेहरकर सिने अभिनेते प्रदीप देवकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्वप्नल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ शोभाताई बल्लाळ उपाध्यक्ष रवी सावंत कार्याध्यक्ष मयूर बल्लाळ आयोजक सौ रुपाली जाधव सई गोंधळेकर उज्वला गायकवाड सुजाता दळवी तसेच अनेक पुरस्कार ती मान्यवर उपस्थित होते
राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने गोरगरीब, अस्थिव्यंग ,मूकबधिर, मतिमंद, निराधार, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी बांधव, यांना मोलाच असं सहकार्य सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, डोळे तपासणी शिबिर, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून जमेल तेवढे समाजासाठी काम करत राहणे आधी सामाजिक कामे केली आहेत याची दखल घेत स्वप्नल फाउंडेशन पुणे या संस्थेने सौ लक्ष्मी संजय सरवदे सरपंच ग्रामपंचाय घारगाव यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, विद्यमान सरपंच अनिता राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश अंगद पवार, माजी सरपंच सौ लोचना नागनाथ पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे, कविता होगले, समस्त घारगावकर ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलाच्या अडीअडचणीसाठी व विद्यार्थ्यांसाठी सदैव सेवा करण्याचे काम करत राहणार असे सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.
