करमाळा एसटी स्टँडवरून जिल्हा परिषदमधील महिला कर्मचाऱ्यांची दहा हजारांची चोरी
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील एसटी स्टॅण्डवर एसटी बसमध्ये चढताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे कार्यरत असलेल्या तुळसाबाई ज्ञानदेव करे (वय 54) यांच्या बॅगमधून चोरट्याने १० हजार रुपये लंपास केले असल्याची घटना घडली आहे. यामध्ये तुळसाबाई करे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
करे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शुक्रवारी (ता. २२) करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून काम संपल्यानंतर एसटीने घरी जाण्यासाठी एसटी स्टॅण्डवर गेले. तेव्हा चिखलठाण बसमध्ये चढताना अनोळखी चोरट्याने बॅगेतील १० हजार रुपये लंपास केले आहेत. कार्यालयातील जयंतकुमार जाधव यांच्याकडून शेतीच्या कामासाठी १० हजार रुपये हात उसने म्हणून घेतले होते.
घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने शुक्रवारी घरी लवकर निघाले होते. ४ वाजताच्या सुमारास करमाळा येथील बस स्टँडवरून करमाळा ते चिखलठाण गाडीने जात होते. तेव्हा गाडीमध्ये बसले त्यानंतर जवळील बागेची चैन मला उघडी दिसली. बॅग चेक केली तेव्हा जाधव यांच्याकडून घेतलेले हात उसने १० रुपये दिसले नाहीत. त्यानंतर बसमधील कंट्रोल ऑफिस येथे जाऊन चोरी झाल्याबाबत सांगितले. यामध्ये अनोळखी चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
