कृषी संजिवनी मोहीमेअंतर्गत शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करमाळा प्रतिनिधी कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेटफळ तालुका करमाळा येथे शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये यामध्ये कृषी विभागाच्या सुप्रिया शेलार यांनी खरीप लागवड पूर्वतयारी विषयी माहिती देऊन कृषी विभागांतर्गत विविध योजनांची सविस्तर माहिती सांगितली तर कृषी सहाय्यक रोहीणी सरडे यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले छोटे शेती शेतमाल प्रक्रिया उद्योग व्यवसायाविषयी शासनाच्या योजनांची माहिती देऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेचा लाभ ज्यास्तीत ज्यास्त शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले यावेळी नागनाथ शेतकरी गटाचे वैभव पोळ चंद्रकांत लबडे विलास पाटील मुकुंद पोळ, गणेश पोळ यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले.सुरवातीला प्रास्ताविक लोक विकास फामर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक प्रशांत नाईकनवरे यांनी केले या कार्यक्रमाला विलास लबडे, जयनाथ पोळ लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे विष्णू पोळ, गजेंद्र पोळ,विजय लबडे, नानासाहेब साळूंके पांडुरंग नाईकनवरे, सचिन निंबाळकर,गणेश पोळ,लहू पोळ, उदयसिंह पाटील, बळीराम लबडे, धनाजी नाईकनवरे यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
