शेलगावमधील पिण्याच्या पाण्याचा बोअर पंप दुरुस्त करण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी शेलगाव क येथील पाण्याचा बोअर गेल्या चार महिन्यापासुन बंद आहे येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या पंपावर होत असुन सदर पंप बंद असल्याने नागरिकांचे पाण्यावाचुन हाल होत असुन हा पंप दुरूस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त प्रदिप बनसोडे यांनी केली आहे. ग्रामपंचायत शेलगांव क. येथील माळी वस्ती नंबर 2 येथील पिण्याच्या पाण्याचा बोअर मधील पंप गेल्या 4 महिन्या पासून बंद अवस्थेत आहे . ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना वेळोवेळी भेटून फोन करून पंप दुरुस्त करा.आमची पिण्याच्या पाण्याची सोय करा वारंवार सांगून देखील कुठलीच दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
