समाजकल्याण विभाग” अंतर्गत सन २०२५-२०२६ करीता २०% मागासवर्गीय निधी व ५% अपंग कल्याण निधी अंतर्गत वैयक्तीक योजनांचे अर्ज करून लाभ घ्यावा-गटविकास अधिकारी डॉ .अमित कदम
करमाळा प्रतिनिधी समाजकल्याण विभाग” अंतर्गत सन २०२५-२०२६ करीता २०% मागासवर्गीय निधी व ५% अपंग कल्याण निधी अंतर्गत वैयक्तीक योजनांचे अर्ज लाभार्थी यांचेकडुन मागविणेबाबत सन २०२५-२०२६ करीता समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापुर यांचेकडुन खालील प्रमाणे वैयक्तीक लाभांच्या योजना घेण्यात आलेल्या आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम यांनी केले आहे. सदर योजनांना पंचायत समिती करमाळा यांचेकडुन जाहीर प्रचार व प्रसिदधी देण्यात येत आहे. तसेच करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सर्व यांना यादवारे सुचित करण्यात येते कि, आपण आपल्या ग्रामपंचायत स्तरावरुन देखील खालील योजनांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिदध करावी. जेणे करुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांचे अर्ज पंचायत समिती करमाळा येथे प्राप्त होतील याची दक्षता घ्यावी.२०% मागासवर्गीय कल्याण योजनामागासवर्गीयांना शेळीगट (०४ शेळी ०१ बोकड) मागासवर्गीय विदयार्थ्यांना MS-CIT प्रशिक्षण
मागासवर्गीय विदयार्थ्यांना TALLY प्रशिक्षण मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन खरेदी करीता अनुदान,मागासवर्गीय महिलांना मल्टीपर्पझ पल्वरायझर मशीन खरेदी करीता अनुदान,मागासवर्गीय झेरॉक्स मशीन खरेदी करीता अनुदान, मागासवर्गीय महिलांना सोलर ड्रायर /डिहायड्रर मशीन खरेदी करीता अनुदान,५% दिव्यांग कल्याण योजना,दिव्यांगांना शेळीगट (०४ शेळी ०१ बोकड), दिव्यांगांना झेरॉक्स मशीन,दिव्यांगांना पिठाची गिरणी,दिव्यांग स्वयंसहायता समूहांना अर्थसहाय्य, दिव्यांगांना E-MOTION VEHICLE वरील योजना बाबत करमाळा तालुक्यातील पात्र लाभार्थी यांनी प्रस्ताव अर्ज सादर करण्याचे मा.डॉ.श्री. अमित कदम गटविकास अधिकारी (वर्ग-१), पंचायत समिती करमाळा यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे. तसेच वरील योजना बाबत काही अडचण असल्यास श्री. गोरख एम. खंडागळे (कनिष्ठ सहाय्यक), समाजकल्याण विभाग, पंचायत समिती करमाळा मो.क्र.९६२३२५३०२२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


