मकाईच्या निवडणुकिसाठी सात उमेदवार पात्र अपात्र उमेदवारांबाबत अपिलात जाणार – प्रा. रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी,
सध्या सात उमेदवार पात्र झाले आहे अपात्र उमेदवारांबाबत अपीलात जाणार आहे .अशी माहिती मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुक पँनल प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.आदिनाथ कारखाना बाबत येणे बाकी दाखवीले आहे.यासह बऱ्याच विषयाबाबत आम्ही आपील करणार आहे.पात्र व अपिलात जाऊन मंजूर उमेदवारांसह यांना घेऊन निवडणुक लढवणार आहे. आम्ही पुढे आल्यामुळें बागल परिवारास उमेदवारी फॉर्म सुद्धा भरता आला नाही याला कारण बऱ्याच बँकेचे थकबाकी असल्यामुळे ते अडचणीत आले आहेत यातच आमचा विजय झाला आहे अपिलात गेल्यावर त्यातही आमचे सर्व अर्ज मंजूर होणार आहे. आम्ही निवडणुक रणंगणात उतरायला तयार आहे .. समोरा समोर लढण्यासाठी विरोधक भित आहे कारण ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या समोर त्यांना जाता येणार नाही. देणे राहिल्यामुळे ते अडचणीत आहे आम्ही निवडणुक लढवणारच. असेही अखेर रामदास झोळ यांनी सांगितले आहे.
