मकाई साखर कारखान्याच्या वतीने ऊस वाहतूकदारांना बँक ऑफ इंडियाच्या कर्जबाकी नसलेल्या दाखल्याचे वितरण-चेअरमन दिनेश भांडवलदार
करमाळा (प्रतिनिधी) मकाई साखर कारखान्याच्या वतीने ऊस वहातूकदारांना बँक ऑफ इंडियाच्या कर्जबाकी नसलेल्या दाखल्याचे वितरण कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले . भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच वाहतूकदारानी मकाई साखर कारखान्याला सहकार्य केले आहे पुढील काळातही असे सहकार्य असावे असे आवाहन भांडवलकर यांनी यावेळी उपस्थित वाहतूकदारांना केले.
मकाई कारखान्याकडे गाळप हंगाम २०१३/ १४ यावर्षी ऊस ऊस वाहतुकीसाठी करार केलेल्या वाहनांना कारखान्याकडून वाहनावर कर्ज काढून ऊस वाहतुकीसाठी ॲडव्हान्सचे वाटप केले होते. यापैकी काही कर्जाची थकबाकी राहिल्याने वाहतूकदारांना अडचणी येत होत्या. या सर्व कर्जाची कारखान्याच्या वतीने परतफेड करून सर्व वाहतूकदारांना त्यांच्या नावाचा बॅंकेची कसलीही कर्जबाकी नसल्याचे दाखला देण्यात आला आहे . या सर्व दाखल्याचे वितरण चेअरमन भांडवलकर यांच्या हस्ते बागल कार्यालय करमाळा येथे करण्यात आले. सुरवातीला स्वर्गीय लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पुढे बोलताना भांडवलकर म्हणाले की आमच्या नेत्या माजी आमदार शामलताई बागल (मामीसाहेब), रश्मी दिदी बागल व दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल चांगल्या प्रकारे सुरू असून कारखान्यापुढील अडचणी संपल्या आहेत यापुढील काळात कारखान्याच्या विस्तारीकरणासह इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येणार असून या माध्यमातून शेतकरी सभासद वाहतूकदार कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर हरिचंद्र खाटमोडे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर जोगळेकर मुख्य अधिकारी शिवाजी कदम ऊस पुरवठा अधिकारी गोरख काकडे यांच्याबरोबरच वाहतूकदार स्वप्निल गोडगे ,विठोबा कोकरे, संभाजी रिटे, हरिश्चंद्र मगर, माऊली खाटमोडे आजिनाथ गायकवाड ज्ञानदेव ढोले, ज्ञानदेव ठोंबरे उद्धव कांडेकर धनंजय झिंजाडे प्रताप पोळ रावसाहेब शिंदे यांच्यासह शेती विभागातील सर्व ॲग्री सुपरवायझर व तालुक्यातील वाहतूकदार उपस्थित होते.


