Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

इच्छाशक्ती आणि कृतीच्या जोरावरच सुरताल विद्यालयाची यशस्वी घौडदौड- प्रा.गणेश करे-पाटील.

करमाळा /प्रतिनिधी
सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आसाम येथे जाऊन आंतरराष्ट्रीय संगम महोत्सवामध्ये सहभागी होऊन घवघवीत यश प्रदान केल्याबद्दल यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळेस बोलताना प्रा.करे-पाटील पुढे बोलताना म्हणाले की इच्छाशक्ती आणि कृतीच्या जोरावरच सूरताल विद्यालयाची यशस्वी घौडदौड सुरू आहे,आज जे यश विद्यार्थ्यांनी मिळवले आहे ते म्हणजे गेल्या २२ वर्षांपासून बाळासाहेब नरारे यांनी केलेल्या संगीत तपश्चर्याचे फळ आहे, यदाकदाचित करमाळ्याचा इतिहास लिहिण्याची वेळ येईल त्यावेळी सुरताल संगीत विद्यालयाचे नाव त्यात असल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही. सूरताल संगीत विद्यालयाचा नावलौकिक हा करमाळा तालुक्या पुरता किंवा सोलापूर जिल्हा पुरता मर्यादित राहिलेला नसून राज्यात आणि राज्याबाहेर सुद्धा झालेला आहे. आसाम येथे जाऊन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यशकल्याणी तर्फे गौरव करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा.गणेश करे-पाटील यांना विद्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले.यानंतर संध्या जाधव, ऋतुजा विद्वात, अनुश्री मोहिते, शिवांजली राऊत, सार्थक करळे, स्वराली जाधव ,प्रणिती माकुडे, सुचिता फंड, सई फंड , आर्यन अडसूळ, ओमराज कांबळे, वेदांत पाटील, श्रेयश सिरसट , निखिल वाघमारे,ओंकार पवार, ऋषिकेश पिटेकर, ओमराज जागते,रोहित दळवी आदि विद्यार्थ्यांचा प्रा.करे-पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले. सूत्रसंचालन संध्या जाधव यांनी केले तर आभार विठ्ठल पवार सर यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group