करमाळासकारात्मक

करमाळा शहरवासियांना पाण्याची अडचण येऊ देऊ नका अन्यथा आंदोलन* *-भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे यासाठी नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही असे सुतार गल्ली येथील नागरिकांनी केली, यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मुख्याधिकारी साहेब यांना लवकरात लवकर सुतार गल्लीतील तसेच शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा दोन ते तीन दिवसात शहरात तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले,
यावेळी मुख्याधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर आम्ही काम करून पाणीपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले ,
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, हनुमानसिंग परदेशी, अमोल परदेशी , सुवर्णसिंग परदेशी,विशाल परदेशी ,शंकर परदेशी ,अभिजीत परदेशी, पूनमसिंग परदेशी ,बादल परदेशी ,जगदीश परदेशी, रामसिंग परदेशी ,नरसिंग परदेशी ,ओमराजे परदेशी ,महेश परदेशी, अनिल परदेशी ,जयंत काळे पाटील ,सतीश फंड ,ऋषिकेश फंड ,वसीम सय्यद
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group