किरण तात्या सावंत यांचा पट्टया पैलवान गौतम शिंदे यांची उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड*
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धत 80 किलो वजन गटामध्ये भैरवनाथ शिवशक्ती तालीम विहाळ, भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांचा पट्टया पोथरे येथील मल्ल पै गौतम शिंदे यांची उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ही स्पर्धा 2 ते 4 एप्रिल रोजी होणार आहे पै.गौतम शिंदे हा भैरवनाथ शिवशक्ती तालिम विहाळचे आण्णा नायकुडे,रामभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवले आहे पैलवान गौतम शिंदे यांनी मॅटवर 80 किलो वजनामध्ये पैलवान शुभम मगर यांच्यावर मात करून यश प्राप्त केले आहे त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गौतम शिंदे यांचे व त्यांचे गुरु किरण तात्या सावंत यांचे अभिनंदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत भाऊ आवताडे यांनी केले आहे.
