करमाळा

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसुत्री हिच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसुत्री हिच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली असल्याचे असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी व्यक्त केले. राजुरी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रा. रामदास झोळ व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाने साजरी करण्यात आली .यावेळी लालासाहेब जगताप, डॉ. अमोल दुरंदे, श्रीकांत साखरे, एकनाथ शिंदे, राजेंद्र भोसले, बंडू शिंदे, आबा टापरे, विकास टापरे, नागेश गरुड, गणेश शिंदे, आर आर बापू साखरे, नवनाथ दुरंदे, हनुमंत जगताप इत्यादी उपस्थित होते. या दिवशीच राजुरी या गावांमध्ये आय लव राजुरी या डिजिटल फलकाचे उद्घाटन प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले व राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रंगरंगोटी करण्यासाठी प्रा. रामदास झोळ यांनी पंधरा हजार रुपयांची मदत केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेमध्ये सत्कार करण्यात आला . पुढे बोलताना ते म्हणाले की सध्याच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व सुखसोई आहेत. परंतु विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले व या भारत देशाचे संविधान तयार करण्यामध्ये मोठे योगदान दिले असुन त्यांचा आदर्श ठेवुन जीवनात यशस्वी वाटचाल करणे हीच काळाची गरज असल्याचे सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group