करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हा

हातगाडयावरील कार्यवाही थांबविण्यात यावी काॅग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी 
          करमाळा शहरातील गोरगरीब हातगाडयावर करमाळा नगरपरिषद कार्यवाही करत आहे ती कार्यवाही थांबविण्यात यावी याबाबत तहसीलदार समीर माने यांना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी आज निवेदन दिले यावेळी फारूक जमादार दादासाहेब इंदलकर असलम नालबंद उपस्थित होते
            यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की करमाळा शहरातील गोरगरीब हातगाडेवाले शासनाच्या नियमानुसार सोशल डिसटेंशन ठेवून मास्क लावुन पार्सल विक्री करत आहे परंतु आज दुपारी करमाळा नगरपालिकेने हातगाडयावर कार्यवाही केली आहे विशेषतः दररोज हातगाडयावाल्याकडून फी वसुल करत आहे जर हातगाडे बंद झाल्यास त्यांच्या वर उपासमारीची वेळ येणार आहे त्या मुळे रोजीरोटी चा प्रश्न निर्माण होणार आहे त्या मुळे शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन करून सोशल डिसटेंशन ठेवून हातगाडे चालू आहेत त्या मुळे हातगाडयावरील कार्यवाही थांबविण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी केली आहे
error: Don\'t try to copy. Content is protected !!