करमाळा

जनतेचा विरोध डावलून शहराबाहेर प्रशासकीय इमारत बांधू देणार नाही!! टेंडर प्रक्रिया झालेली नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले भूमिपूजन हास्यास्पद!!

करमाळा (प्रतिनिधी
शहराच्या मध्यवस्तीत सर्व जनतेला सोयीस्कर असलेली जागा उपलब्ध असताना व न्यायालय सह सर्व शासकीय कार्यालय जवळपास असणारी मध्यवस्तीतील जागा सोडून गावाबाहेर नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्याचा प्रशासनाचा इरादा नागरिकांना मान्य नाही केवळ आमदार संजय मामा शिंदे यांच्या हट्टपायी ही इमारत शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे याला आमचा तीव्र विरोध असून कसल्याही परिस्थितीत मुख्य प्रशासकीय इमारत शहराच्या बाहेर बांधू देणार नाही वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन उभा करू असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे घाईघाईत करमाळा तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.मात्र या भूमिपूजन नंतर नागरिकांतून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.करमाळाचे नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंजुरी दिली आहे.ही इमारत आहे त्या ठिकाणीच उभी करावी अशी सर्व जनतेची मागणी असून अनेक संघटना व पक्षांनी याची निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत.ही इमारत शहराबाहेर येण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असून या बांधकामाला मुख्यमंत्र्याकडून स्थगिती घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चिवटे यांनी दिली आहे

#####

शेवट जनतेचे मत महत्वाचे असून
संपूर्ण करमाळा तालुक्यातील जनता हे नवीन प्रशासकीय इमारत आहे त्या ठिकाणीच व्हावी अशी मागणी करत आहे असे असताना प्रशासन मात्र जागा अपुरी आहे असे कारण दाखवून तहसील कार्यालय व प्रशासकीय इमारत गावाबाहेर नेण्याचा अट्टाहास करत आहेत
अजून या कामाचे टेंडर झालेले नाही तरीसुद्धा अजित पवार यांनी मी काम केले असं दाखवण्यासाठी केलेले भूमिपूजन हास्यस्पद आहे.याबाबत आम्ही तहसीलदार ठोकडे यांच्याशी चर्चा केली असून नवीन जागेचा प्रस्ताव देत आहोत.

महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर
#####

या इमारतीसाठी अडीच एकर जागा लागते ही जागा जवळपास उपलब्ध झाले तर जागेचा प्रस्ताव बदलून देऊ
जनतेचे मत विचारत घेऊ

शिल्पा ठोकडे तहसीलदार करमाळा

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group