करमाळाच्या कमलादेवी मंदिराची उपमुख्यमंत्री अजितदादांकडुन विशेष पाहणी – मंदीराजवळील माई माऊलीची देखिल आस्थेवाईकपणे चौकशी
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती होती त्यांचे सह खासदार सुनीलजी तटकरे , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर , आमदार संजयमामा शिंदे यांचे सह बहुसंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती . सकाळी १०:२५ मिनिटांनी मान्यवरांचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात हॅलीपॅडवर आगमन झाल्यावर करमाळा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भरतभाऊ आवताडे , करमाळा माढा प्रवक्ते ॲड अजित विघ्ने , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड , जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जामदार व राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी स्वागत केले . तेथुन त्यांनी मोटारिने कमलाभवानी मंदीर येथे दर्शन घेतले व जनसन्मान यात्रेला सुरुवात केली. . बहुसंख्य कार्यकर्त्यांचे उपस्थित रॅलीने कार्यक्रमाचे ठिकाणी पोहोचले परंतु माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आई कमलादेवीचे दर्शन घेऊन आनंदीत झाल्याचे सांगितले व या संपुर्ण परिसराची पहाणी केली यावेळी कमलादेवी मंदीर समितीतर्फे उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी विश्वस्त सोमनाथ चिवटे , ॲड शिरिष लोणकर , कन्हैय्यालाल देवी , ॲड राहुल सावंत व मान्यवर उपस्थित होते.
