श्री ज्ञानदेव गायकवाड सरांचा संगोबा येथे 90 वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संगोबा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .ज्ञानदेवराव गायकवाड यांचा 90 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला .हा कार्यक्रम श्री संगमेश्वर विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाळेचे मुख्याध्यपक सुनिल शिंदे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ऍड रमण मस्के,सह सचिव तथा बोरगावचे सरपंच विनय ननवरे हे होते .
यावेळी हनुमंत चांदणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत नानांच्या कागिरीचे भरभरून कौतुक केले .आई वडिलांची सेवा केली तर कुठेही जाण्याची गरज नाही .त्यामुळे नानांची तबेत् कशी दणकट आहे कारण त्यांच्यात समाधानाची लकेर असून त्यामुळे त्यांच आयुष्य आणखीन वाढणार आहे .आपल्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना
मुख्याध्यापक शिंदे यांनी नानांच्या समवेत काम करण्याची सुवर्ण संधी आम्हांला मिळाली आहे हे आमचे भाग्य समजतो . सचिव मस्के व सह सचिव विनय ननवरे व् यांनी आपले विचार व्यक्त केले व नानांना भरभरून शुभेच्या दिल्या .या कारयकरमा चे सूत्रसंचालन किरण भागडे यांनी तर आभार शरद घाडगे यांनी मानले .
यावेळी देवानंद चव्हाण , जगन्नाथ गायकवाड, सतीश बापू गायकवाड,राजेश गायकवाड ,कल्पना गायकवाड,पिंटू भोज,रोहन भोई उपस्थित होते .सर्व उपस्थित व विध्यार्थी यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला .
