निसर्गप्रेमी प्रतिष्ठानच्यावतीने 14 नोव्हेंबरला वृक्ष संगोपन कार्यक्रम – प्रकाश क्षिरसागर
करमाळा प्रतिनिधी पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे मात्र लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करून त्यांची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे यामुळे निसर्गप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने जुलै महिन्यात करण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन कार्यक्रम 14 नोव्हेंबर रोजी शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संताजीनगरचे मालक युवा उद्योजक प्रकाश क्षिरसागर यांनी दिली.निसर्गप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने जुलै महिन्यामध्ये गुळसडी रोड वरील माळरानावर 100 वृक्षारोपण आणि विविध शाळा आणि अंगणवाड्या 300 वृक्षांचे वाटप करण्यात आले होते.11 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत त्या सर्व वृक्षांचे संगोपन करण्यात येणार आहे.त्यामध्ये गरज असेल तिथे ट्री गार्ड लावणे,त्यांना आळे करणे आणि त्यांची साफ सफाई करणे इत्यादी गोष्टी करण्यात येणार आहे.नवीन पिढीला पर्यावरणाची जाणिव व्हावी आणि आपली सामाजिक बांधिलकी जपता यावी ही या मागची भावना असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव नरेंद्र ठाकूर आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केले आहे.
