करमाळाकृषीजलविषयक

कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडा; अन्यथा २७ जुलैला आंदोलन करणार -संतोष वारे‌


करमाळा प्रतिनिधी :
कुकडीचे पाणी मांगी तलावात तसेच तलावाखालील परिसरातील गावांना मिळवण्यासाठी येत्या बुधवारी २७ जुलैला सकाळी १० वाजता टेंभुर्णी-अहमदनगर या राज्यमार्गावर जातेगाव (ता.करमाळा) येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली होत असून या आंदोलनात सर्वपक्षीय गटातटाचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती श्री. संतोष वारे यांनी दिली.
याबाबत जादा माहिती देताना श्री.संतोष वारे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील काही भागात अद्याप जोराचा पाऊस झालेला नाही. मांगी व तलाव परिसरात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला नसल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसणार आहे. मांगी तलावावर बारा गावांसाठी पाणीपुरवठा योजना आहे, परंतु मांगी तलावामध्ये उपलब्ध पाणीसाठा नसल्यामुळे ही योजना सध्याच्या स्थितीत बंद अवस्थेत आहे. तरी याचा पाठपुरावा कुकडी कोळवाडी कार्यालयात तसेच करमाळा तहसील कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊन व रस्ता रोको आंदोलन करूनही कुकडीच्या अधिकारी मांगीतलावात व परिसरात कुकडीचे पाणी कॅनल चारीला पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहेत. कुकडी धरणाचा पाणीसाठा पाहता कुकडी धरणांमध्ये मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. तसेच आता त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे असल्यामुळे सध्या ओव्हर फ्लो चे पाणी श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात सुरू आहे. ते पाणी मांगी तलाव, रावगाव, भोसे, पुनवर, जातेगाव, वडगाव, कामुणे, खडकी, पोथरे अशा कुकडीच्या कॅनल चारीला सोडण्यात यावे. यासाठी रस्ता रोको करण्यात येणार आहे. असा इशारा राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व आंदोलकांनी दिला आहे
दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा सचिन नलवडे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ता. अध्यक्ष सुदर्शन शेळके, रामभाऊ नलावडे, विठ्ठल शिंदे, संदीप नलवडे, लक्ष्मण भालेराव, चंद्रकांत काळे, शिवदास नलवडे, औदुंबर नलवडे, अजित पवार, रमेश पाटील, माधव पाटील, महेश मोरे, आप्पा जाधव, समीर शेख, अशोक वारे, बापु बर्डे, राहुल पवार, छगन लगस, पंकज नलावडे, दादासाहेब कुदळे, संजय शिंदे, सागर जगताप, अशोक शिंदे, अशोक वारे आदिंच्या सह्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group