108 वी श्री तिरुपती बालाजीची श्रीवारीमिठ्ठु ते तिरुमल्ला पायी वारी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील रायगांव गावचे निश्चिम बालाजी भक्त,श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माण समितीचे,वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण नेमचंद बुधवंत यांची 108वी श्री तिरुपती बालाजींची श्रीवारी मिठ्ठु ते तिरुमल्ला पायी वारी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण झाली..त्यांचा संकल्प दरमहा पौर्णिमेला एक वारी पुर्ण करतात,श्री तिरुपती बालाजी ची पहिली वारी दिनांक.. 16/6/2016पासुन श्री तिरुपती बालाजी पायी वारी चालु केली व 108 वीवारी दिनांक..27/11/23..रोजी संपन्न झाली..श्री तिरुपती बालाजी दरमहा देवदर्शन वारीचा संकल्प हैदराबाद चे आमचे बंधु वेणु कुमार चुक्ला यांचा आदर्श घेऊन चालू केली ,1008वारी पुर्ण करण्याचा संकल्प आहे.. येथून पुढे ही चालुच राहिलं.. आजपर्यंत ही वारी संपूर्ण करण्यासाठी वेणु कुमार चुक्ला,रणजित दादा नलवडे,हरिनाथ गोंड,अतुल जी जाधव,रायगांवचे माजी ऊपसरपंच विष्णू पंत गरजे,लव्हुरीचे सचिनजी इंगळे, डॉ योगेश पाटील, गणेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर सर्व बालाजी भक्तांचेही मार्गदर्शन लाभले …
