करमाळा तालुक्याच्या राजकारणात बागल गटाची यशस्वी धुरा संभाळणारे बहिण भाऊ दिदी प्रिन्सभैय्या अनोखा रक्षाबंधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या राजकारणात सोलापुर जिल्हयातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात बहिण भावाची जोडीने आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर बागल गटाची यशस्वी धुरा संभाळली आहे.माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिगंबरराव बागल मामाच्या अकाली निधनानंतर बागल गटाची जबाबदारी रश्मी दिदीवर आली..दिदींनी आय एस आय अधिकारी व्हावे ही मामांची इच्छा होती.परंतु मामाच्या अकाली निधनामुळे बागल गटाची संपूर्ण जबाबदारी दिदी वर पडल्याने हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही मात्र दीदीने मामाच्या पश्चात मार्गदर्शक विलासराव घुमरे सरांच्या मार्गदर्शनाखाली बागल गट जीवंतच ठेवला नाही तर मामीना आमदार करण्यापासुन भाऊ दिग्विजय बागल यांना राजकारणात आणुन मकाईचे चेअरमन करण्यासाठी दिदीचे योगदान महत्वाचे आहे. उत्तरोत्तर प्रगती घडून तालुक्यातील सर्व प्रमुख सत्तास्थाने काबीज करण्यासाठी नेतृत्वाखाली कार्यरत आहे.एकमेकांना प्रत्येक संकटात, वाईट प्रसंगात, सुखदुःखात साथ देणारे हे बहिण-भाऊ. आपले नात्यात किती ही संकटे आली तरी अतूट ठेवले. निस्वार्थी राजकारणात मोठ्या बहिणीला कणखर साथ देऊन जिल्ह्यात आपल्या नावाचे वजन ठेवले. आज रक्षाबंधना निमित्ताने तालुक्याच्या स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल यांनी आपला पोलादी मनगटाचा भाऊ दिग्विजय भैय्या बागल यांना राखी बांधून हा सण साजरा केला आहे..
