मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचे सर्व उमेदवारी विजय होतील धनंजय डोंगरे यांनी व्यक्त केला विश्वास
करमाळा प्रतिनिधीबागल गट हा एक कुटुंब असून सर्व कार्यकर्ता हीच बागल गटाची ताकद असल्यामुळे मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचा विजय निश्चित आहे असे मत आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी व्यक्त केले चिखलठाण येथे मतदानाचा हक्क बजावून ते म्हणाले की मकाई कारखान्यासाठी आमच्या नेत्या रश्मी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांनी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून कारखाना वाचवण्यासाठी सहकारी तत्त्वावर राहण्यासाठी मोठा त्याग केला आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन .हेच बागल गटाचे उत्तराधिकारी समजून नेत्यांनी शेतकरी कामगार हितासाठी काम केले आहे त्यामुळे नऊ जागी उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
