राजुरी येथे नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न
राजुरी प्रतिनिधी बुधराणी हॉस्पिटल व राजुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दि.02/11/21 रोजी सकाळी 10 वाजता राजुरी ग्रामपंचायत कार्यालयात डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले , या शिबिरामध्ये मोतीबिंदू,काचबिंदू,तिरळेपणा अशा अनेक डोळ्यांच्या समस्या वर मोफत उपचार होणार आहेत. एकूण 60 जणांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 12पेशंट मोतीबिंदू निदान झाले त्यांचे मोफत ऑपरेशन दिवाळीनंतर करण्यात येईल. काहीं दिवसातचं राजुरी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सर्वं रोग निदान शिबिर घेण्यात येणार आहे असे सरपंच डॉ.अमोल दुरंदे म्हणाले* आजच्या शिबिराचे उदघाट्न प्रगतशील बागायतदार श्री.लालासाहेब भोईटे यांनी केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ. अमोल दुरंदे, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, नंदकुमार जगताप,संजय साखरे,अजय साखरे, संभाजी जाधव,श्रीकांत साखरे, लक्ष्मण टापरे उपस्थित होते.
