करमाळा

शासनाला जर भीक लागली असेल तर पूल न बांधता अधिकृतपणे जलवाहतूक सुरु करावी- चिंतामणी दादा जगताप


करमाळा प्रतिनिधी-22 मे रोजी करमाळा तालुक्यातील कुगांव येथून कळाशीकडे अनाधिकृत बोटीतून प्रवास करत असताना बोट उलटून झालेल्या अपघातात जवळपास सहा प्रवाशी मृत पावल्याची घटना घडली.यात दोन बालकांचाही समावेश आहे.एनडीआरएफचे पथक व खासगी बोटीच्या साह्याने त्यांचा शोध सुरु होता. घटना घडल्याचे समजल्यापासून बेपत्ता व्यक्तींचे शोध कार्य सुरु होते. मंगळवारी रात्री अंधारात तपास कार्यात अढथळा आला होता. बुधवारी सकाळी साडेसात वाजता शोध कार्य सुरु झाले. करमाळा हद्दीतील बाजूला कुगावसह परिसरातील नागरिकांकडून शोध घेतला जात होता तर कळाशीच्या बाजूनेही शोध मोहीम सुरु होती. एक पाणबुडी, तीन बोटी व २० जवान हे शोध घेत होते. त्यांच्या मदतीला परिसरातील मच्छिमारांच्या व प्रवासी बोटीही धावत होत्या.
या घटनेमुळे संपूर्ण करमाळा तालुक्यातील जनमानसात हळ-हळ व्यक्त केली जात आहे. वास्तविक पाहता अनधिकृतपणे असा बोटीचा वापर करून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचे धाडस कसे होऊ शकते असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. मग यातून एकच गोष्ट लक्षात येते की याचे धागे दोरे हे शासकीय टेबलाखाली निश्चितपणे पोहचत असल्याशिवाय बोटीवाले हा व्यवसाय करण्याचे धाडस करणार नाहीत. असा अनधिकृत व्यवसाय हा संपूर्ण राज्यामध्ये खुले आम चालू आहे. शासनाने यावर धाडशी निर्णय घेऊन असे अनधिकृत व्यवसाय ताबोडतोब बंद करावेत किंवा शासनाने स्वतः मार्फत प्रवाशांना ये- जा करण्यासाठी सर्व सोईयुक्त असलेली जल वाहतूक सुरु करावी अशी मागणी मार्केट समितीचे मा. उपसभापती चिंतामणीदादा जगताप यांनी केली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group