शिवसेनेवर अधिकार कुणाचा? 16 आमदारांचं निलंबन? सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता 22 ऑगस्टला सुनावणी
शिवसेनेवर अधिकार कुणाचा? 16 आमदारांचं निलंबन– शिवसेनेवर अधिकार कुणाचा? आणि 16 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आताही सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होईल. यापूर्वी, ही सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार होती. मग ती 12 ऑगस्टला होणार होती, हे येथे उल्लेखनीय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारानंतर उद्या, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या पाच याचिकावर ही सुनावणी सुरू आहे. उद्या, दि 12 रोजी होणारी सुनावणी आता 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.“खरी शिवसेना आमचीच’ असा दावा सेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ही याचिका घटनापीठाकडे पाठवायची की नाही? ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडून ठरविली जाणार आहे. शिवसेनेने केलेली निलंबनाची कारवाई या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने असून दोन्ही पक्षांच्या वकिलांनी मागच्या सुनावणीत तर्कवितर्क मांडले होते.दरम्यान, सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. यामुळे ही सुनावणी त्यांच्याच घटनापीठासमोर कायम राहण्याची शक्यता आता खूप कमी आहे. या आधी सरन्यायाधीश रमणा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना अत्यंत कडक अशा शब्दात ताशेरे ओढले होते. त्यामुळे 22 तारखेच्या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
