करमाळा

वाशिंबे रेल्वे बोगदा पूल ते भैरवनाथ मंदिर पानंद रस्ता मंजूर प्रा. रामदास झोळ यांनी मांडला होता प्रस्ताव महेश चिवटे यांच्या मदतीने पानंद रस्ता झाला मंजूर

करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावातील वाशिंबे रेल्वे बोगदा पुल ते भैरवनाथ मंदिर या पानंद रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होती हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याचे प्रा.रामदास झोळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या रस्त्याचा प्रस्ताव शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी रोजगार हमी फलोउत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे पाठपुरावा करुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग़्राम समृध्दी पाणंद रस्ते सहमती योजनेतुन विषय उपस्थित करून सदर पानंद रस्ता मंजुर करून घेतला आहे. त्यामुळे वाशिंबे गावातील वाशिंबे रेल्वे बोगदा पूल भैरवनाथ मंदिर पानंद रस्त्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटला असून प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. या कामी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचे बहुमोल मार्गदर्शन सहकार्य लाभले आहे. वाशिंबे गावचा पानंद रस्त्याचा प्रश्न मिटल्याने वाशिंबे ग्रामस्थांनी प्रा. रामदास झोळ शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आभार मानले असुन विकासाची कास धरून गावातील विकासकामांसाठी झटणाऱ्या त्यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे प्रा.रामदास झोळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group