Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

दिव्यांगाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांगिंण विकासाकरीता सहानुभूती सह सक्षमीकरणाची गरज मुख्याधिकारी बालाजी लोंढे.

करमाळा प्रतिनिधी दिव्यांगांना  अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या निवारण्यासाठी व त्यांच्या हिताच्या दृष्टीने सहानभुतुसह सक्षमीकरणाची गरज असल्याचे मत  मुख्याधिकारी बालाजी लोंढे  यांनी व्यक्त केले 

करमाळा नगरपरिषदेच्या वतीने माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत, करमाळा शहरातील दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा, मा.जयवंतराव जगताप बहुउद्देशी सभागृह येथे आयोजित कार्यशाळा प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन गुंजकर होते. प्रमुख पाहुणे अजित रायपुरकर क्ष-किरण वैद्यकीय अधिकारी, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, रोहन भालेराव, दामोदर परबत, आरोग्य निरीक्षक जब्बार खान, दीनदयाळ उपाध्याय विभागाचे तुषार टंगसाळे हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बालाजी लोंढे म्हणाले की यूआयडी कार्ड, ऑनलाइन प्रमाणपत्र, शासनाच्या विविध योजना, यासाठी लागणारे तत्सम कागदपत्र प्राप्त करण्यासाठी दिव्यांगाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या निवारण्यासाठी व त्यांच्या हिताच्या दृष्टीने सहानुभूतीसह सक्षमीकरण कार्यशाळाची गरज आहे.यामुळे विचारांची देवाण-घेवाण होते हे कार्य व सहकार्य दिव्यांगाच्या सहभागाने करमाळा नगरपरिषद करीत आहे.
डॉक्टर गजानन गुंजकर व अजित रायपुरकर यांचेही मार्गदर्शन लाभले.तर प्रास्ताविक मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी केले. सूत्रसंचालन करमाळा नगरपरिषद चे इसाक पठाण यांनी केले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष कुंभार,समीर बागवान,भाऊसाहेब आरणे, प्रशांत कांबळे, तानाजी सुरवसे, आसमा कुरेशी, दिलीप किरवे, अक्षरा बोरा, हेमंत शिंदे, संजय मुरकुटे, सत्तार शेख, ज्योतीराम माने, गोरखनाथ जाधव, किशोर कुंभार, सुशील गानबोटे, , बाळासाहेब दीक्षित, निर्मला भुसारे, सुशील वनारसे, उत्तम क्षीरसागर, शुभम कुंभार, वासंती टकले दुर्गा क्षीरसागर, इत्यादीसह बहुसंख्येने दिव्यांग उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा नगर परिषदेचे कार्यालयीन प्रमुख दिगंबर देशमुख, मिळकत विभागाचे गजानन राक्षे, अभय देशपांडे, रावसाहेब कांबळे, राजेंद्र झाडबुके, सुरज मेहतर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.शेवटी आभार, प्रहार आपंग क्रांती आंदोलन संघटनेचे करमाळा शहराध्यक्ष समीर बागवान यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group