*सुरताल संगीत विद्यालयात दिवाळी पहाट भक्तिरंग कार्यक्रम संपन्न*.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयात दिवाळी पहाट भक्तिरंग कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे सर्वेसर्वा श्री बाळासाहेब नरारे यांनी शांताकारम भुजगशयनम या या श्लोकाने गायनास प्रारंभ केला. राग भैरव मधील एकतालातील जागो ब्रिज राज यानंतर राग जौनपुरी मधील परीये पायल वा के सजनी या बंदिशी सादर केल्या. यानंतर कोण बतावे बाट गुरु बिन हे आपल्या सुमधूर आवाजात सादर केले. या मध्ये विद्यार्थ्या समवेत विठ्ठल माझा माझा, पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा , माधवा मधुसूदना, माझ्या हृदयाच्या मंदिरी, आज गोकुळात रंग खेळतो , विठ्ठल टाळ , आनंदाचे डोई आनंद तरंग असे विविध प्रकार चे भक्तीरसपूर्ण गीते सादर करण्यात आले. यामध्ये डॉ. स्वाती घाडगे , रेश्मा जाधव, शिवानी गोफने ,तेजस्विनी कौले सुचिता फंड, शांतीलाल झिंजाडे , माऊली झिंजाडे ,रोहित दळवी आदी विद्यार्थ्यांनी गायनात सहभाग नोंदवला . कार्यक्रमाची सांगता नरारे यांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील सिंध भैरवी या रागातील सर्वात्मका शिव सुंदरा या नाट्य गीताने करण्यात आली. तबला संगत नाना पठाडे यांनी केली. यावेळी विद्यार्थी आणि श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक दिगंबर पवार तर आभार निलेश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम एन यशस्वी होण्यासाठी श्री संतोष पोतदार , किशोर नरारे, राहुल वायकर यांनी परिश्रम घेतले.
