कामगार नेते कै. सुभाष आण्णा सावंत यांचे कार्य प्रेरणादायी: दिग्विजय बागल.

करमाळा प्रतिनिधी कामगार नेते कै सुभाष आण्णा सावंत यांनी कष्टकरी कामगार हमाल या वर्गासाठी केलेले कार्य करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असुन त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवुन त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांची भावी पिढी म्हणुन सावंतगट काम करत आहे. सुभाष आण्णा सावंत यांच्या कार्याचा आदर्श घेऊन युवकांनी समाजकारणात वाटचाल करावी असे मत मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका हमाल पंचायतचे संस्थापक, तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्व. सुभाष अण्णा सावंत यांची आज पुण्यतिथी हमाल पंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी दिग्विजय बागल बोलत होते . यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांनी स्व. सुभाष अण्णा यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत त्यांना अभिवादन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल सावंत, सुनिल सावंत, नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत, शशिकांतभाऊ केकाण, शंभूराजे फडतरे उपस्थित होते.
