आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी बागल गटाच्या विनंतीवरून उमेदवारी अर्ज माघारी घेणाऱ्याचे मनापासून आभार -दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी- श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटामार्फत ज्यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले त्या सर्वांनी बागलगट नेत्या भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका आदरणीय रश्मी दिदी बागल व मार्गदर्शक माननीय विलासरावजी घुमरे सर यांच्या आदेशावरून सर्वांनी आपले नामनिर्देशन पत्र आज रोजी माघारी घेतले, याबद्दल शिवसेना जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन माननीय दिग्विजय बागल यांनी सर्व उमेदवारांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी करता बागल गटामार्फत बागल संपर्क कार्यालयातून नामनिर्देशन पत्र भरण्यात आले होते. या सर्व इच्छुक उमेदवारांची मीटिंग चार दिवसाखाली बागल संपर्क कार्यालयात संपन्न झाली होती त्यावेळी मार्गदर्शक माननीय विलासरावजी घुमरे सर व युवा नेते माननीय दिग्विजय बागल यांनी फॉर्म भरलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांना गटनेत्या आदरणीय रश्मी दिदी बागल व मार्गदर्शक माननीय विलासरावजी घुमरे सर यांचा फॉर्म माघारी घेण्याबाबत आदेश दिला होता. त्याप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांनी माननीय रश्मी दीदी बागल यांचा आदेश मानून आपले उमेदवारी अर्ज आज रोजी माघारी घेतले आहेत. लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या विचारानेच यापुढील काळात कार्यरत राहून जो कोणी आदिनाथच्या सत्तेवर येईल त्याला आपले संपूर्ण सहकार्य राहील असे युवा नेते दिग्विजय बागल यांनी शेवटी सांगितले.
