आमदार नारायण आबा पाटील यांचेसह महाआघाडीचचे २१ उमेदवार निवडणुक रिंगणात -सुनील तळेकर
करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील यांचेसह महाआघाडीचचे २१ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली . आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून आजी माजी आमदारासह इतर काही जणांचे पॅनल जाहिर झाले आहेत. पाटील गटाच्या वतीने पॅनल बद्दल माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जेष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव जगताप , खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार नारायण आबा पाटील, सावंत बंधू यांच्या एकत्रीत विचारातुन या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने
निवडलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. जेऊर गटातुन १) श्रीमांत त्रिंबक चौधरी (उमरड), २) महादेव श्रीपती पोरे (कुगाव) ३) दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे (पोपळज) तर सालसे गटातुन १) रविकिरण पोपट फुके (करंजे) २) दशरथ येदू हजारे (जवळा) ३) आबासाहेब उर्फ वसंत शंकर अंबारे (गौंडरे). तसेच पोमलवाडी गटातून १) किरण जगन्नाथ कवडे(कात्रज) २) नवनाथ मधूकर झोळ (वाशिंबे) ३) संतोष खाशेराव खाटमोडे पाटील तर केम गटातुन १) दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख (वांगी १) २) विजयसिंह जिजाबा नवले (कंदर) ३) महेंद्र दिनकर फाटील (बिटरगाव ) तसेच रावगाव गटातुन १) देवानंद गोपाळ बागल (मांगी) २) अडव्होकेट राहुल सुभाष सावंत (करमाळा) ३) डाॅ अमोल नानासाहेब घाडगे (तरटगाव) तसेच सोसायटी मतदार संघातुन डाॅ हरिदास तुळशीराम केवारे (आळजापुर) तर एस सी राखीव प्रवर्गातून राजेंद्र उर्फ राजाभाऊ भीमा कदम (उमरड) तर महिला राखीव मतदार संघातून राधिका भीमराव तळेकर (वांगी ) व उर्मीला हनूमंंत सरडे (चिकलठाण) तसेच इतर मागासवर्ग मतदार संघातून दादासाहेब नामदेव पाटील (बिटरगाव ) यांना उमेदवारी देण्यात आली. तर आमदार नारायण आबा पाटील हे एन टी राखीव मतदार संघातून निवडणुकीत उतरले आहेत अशी माहिती प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.


