Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

गणेश चिवटे म्हणजे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नेतृत्व- भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर

करमाळा प्रतिनिधी 
भाजपाचे नेते गणेश चिवटे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नेतृत्व आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले ,भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने झरे येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला.
पुढे बोलताना ते म्हणाले की गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यातील भाजपा संघटन मजबूत झाले असून श्री चिवटे यांनी आता तालुक्याचे राजकीय नेतृत्व करावे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे सांगितले,
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून गणेश चिवटे यांनी आपण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून राज्यातील व देशातील भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे असून हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. यामुळे कोट्यावधी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकरी हितासाठी आपण यापुढे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना पोहोचवणार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले,
यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उमेश मगर, बंडू शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांचीही भाषणे झाली. यावेळी त्यांनी झरे व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या योजनांची माहिती व त्यांच्या लाभाविषयी मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले तर आभार किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे यांनी मानले,
या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पै अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,माळशिरसचे बाळासाहेब वावरे , तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे,नितीन झिंजाडे, बिटरगाव चे माजी सरपंच डॉ.अभिजीत मुरूमकर, सहकार सेलचे तालुकाध्यक्ष आजिनाथ सुरवसे, संतोष कुलकर्णी ,लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, हनुमंत रणदिवे, गणेश माने, हरिभाऊ झिंजाडे, विष्णू रंदवे, दौलत वाघमोडे, हर्षद गाडे, समाधान कांबळे, अशोक ढेरे, प्रकाश ननवरे, सुनिल जाधव, सुनील नेटके, नितीन निकम, संदिप काळे, दत्ता एकाड, दादा गाडे, ईश्वर मोरे, किसान मोर्चाचे गणेश परदेशी, जयसिंग भोगे ,शिवाजी नाळे, अनिल गायकवाड, हर्षल शिंगाडे , अमोल दुरंदे , शिवाजी बोराडे, मोहन नेटके , बाबु गायकवाड, गणेश वाळुंजकर, बापू मोहोळकर यांच्यासह झरे येथील भरत भाऊ घाडगे , नानासाहेब घाडगे, हनुमंत शिंदे ,खंडू पिसाळ, शंकर घाडगे, बाबू व्यवहारे, राम गुळवे , किरण शिंदे, प्रविण शिंदे, उत्तरेश्वर शेळके ,नाना कांबळे , माजी सरपंच शिवाजी पिसाळ ,राजू गायकवाड, शिवाजी ढावरे, विजय ढावरे, विठ्ठल घाडगे, शिवाजी कांबळे, हनुमंत मावलकर, बापू जाधव ,सोमनाथ घाडगे ,दादासाहेब दुरगुडे , तुकाराम चौधरी, सुहास चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व झरे पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group