कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा- हुलगेवाडी चारीचे कामाचा उद्या भूमिपूजन शुभारंभ…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या व गेल्या 12 -13 वर्षापासून प्रलंबित असलेल्या कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा हुलगेवाडी चारीचे काम करणे या कामाचा प्रारंभ उद्यापासून होत असून या कामामुळे 5531 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पोंधवडी चारीचे काम पूर्ण झाल्यानंतर एकूण 5 हजार 531 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून या कामासाठी 9 कोटी 23 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ विहाळ, कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी , कुस्करवाडी, पोंधवडी, उमरड ,अंजनडोह ,राजुरी, सोगाव या गावांना होणार आहे.
या कामाचा भूमिपूजन समारंभ आ.संजयमामा शिंदे (आमदार – करमाळा माढा) यांचे शुभहस्ते व मा.आ.जयवंतराव नामदेवराव जगताप (माजी आमदार करमाळा ) यांचे अध्यक्षतेखाली उद्या दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी सायं 4 वाजता विहाळ येथे संपन्न होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री वि. गि. राजपूत , कार्यकारी संचालक, म.कृ.खो.वि.म., पुणे ,श्री हे.तु. धुमाळ, मुख्य अभियंता. पुणे ,संतोष सांगळे, अधिक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे, रामदास जगताप, कार्यकारी अभियंता, कुकडी वितरण बांधकाम विभाग, कोळवडी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ. संजयमामा शिंदे कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.”
