संगोबा ते घारगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे दुरुस्तीची मागणी- मा. सरपंच लक्ष्मी सरवदे
करमाळा प्रतिनिधी करमाळा ते घारगाव हद्दीत रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झालेली आहे करमाळा ते घारगाव दरम्यान रस्त्यात ठिक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आता ट्रॅक्टर मधून ऊस वाहतूक चालू झालेली असून या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब होऊ लागली आहे.
सातत्याने सुरू असणारी वाहतूक यामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहे दिवसेंदिवस खड्ड्यांचे आकार आणि खड्ड्यांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे आत्ता त्रासदायक ठरत आहे सोबतच ऊस वाहणारी ट्रॅक्टर सारखी वाहणे या मार्गावरून सातत्याने ये जा करत आहेत खड्ड्यामधून ऊस वाहतूक करणारी वाहने जात असताना उसाच्या मोळ्या खाली पडण्याचे प्रकार आणि उसाचे भरलेली ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे रस्त्याच्या अवस्थेला नागरिक वैतागले असून तत्काळ रस्ता दुरुस्ती व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. *


