समोर येऊ शकले नाहीत ते मला आतून मदत करतील झेडपी निवडणुकीत अनेक चमत्कार घडणार – सौ लक्ष्मी संजय सरवदे- वायकुळे

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच विविध नेते, कार्यकर्ते व मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. करमाळा तालुक्यात राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.समोरून जे येऊ शकले नाहीत, ते आतून मला मदत करतील. त्यामुळे येत्या झेडपी निवडणुकीत अनेक चमत्कार घडतील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
सरवदे पुढे म्हणाले की सध्याच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपामुळे अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. काही ठिकाणी जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलले गेले तर काही ठिकाणी अचानक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामुळे जाहीरपणे विरोध न करता अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आतून भूमिका बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही.राजकारणात नाराजी उघडपणे दिसत नाही मात्र ती मतदानाच्या दिवशी मतपेटीतून बाहेर पडते.
जिल्हा परिषद निवडणुकीत केवळ पक्षाचे चिन्ह पुरेसे ठरत नाही तर उमेदवाराची स्थानिक पकड, कामाचा अनुभव ग्रामस्थांशी असलेले नाते आणि विश्वासार्हता महत्त्वाची ठरते अनेक ठिकाणी मतदार पारंपरिक राजकारणाला कंटाळले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अपेक्षेच्या बाहेर निकाल लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. समोरून विरोध न करता आतून मदत करणे हा आपल्या ग्रामीण राजकारणाचा एक भाग आहे. काहीजण पक्षासाठी नाही तर व्यक्तीसाठी मतदान करतात. त्यामुळे ज्या उमेदवारांनी लोकांशी थेट संवाद ठेवला आहे त्यांच्या बाजूने चित्र झुकू शकते असे मत लक्ष्मी सरवदे यांनी व्यक्त केले.
प्रचारा दरम्यान दिसणारी गर्दी आणि प्रत्यक्ष मतदानातील कल यामध्ये मोठा फरक असतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, विविध गटांत अंतर्गत मतभेद, गुप्त पाठिंबा, तर काही ठिकाणी शांत बंडखोरी होण्याची चिन्हे दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनेक ठिकाणी गणिते कागदावर वेगळी आणि जमिनीवर वेगळी दिसतील. त्यामुळे झेडपी निवडणुकीत अनेक राजकीय चमत्कार घडले तर आश्चर्य वाटायला नको असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषद निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असून निकालाच्या दिवशी कोणाचे पारडे जड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


