Tuesday, October 6, 2026
Latest:
करमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या विद्यमाने स्माईल डेंटल केअर दातांचा दवाखाना यांच्या वतीने विशेष सवलतीचे दंत शिबीर संपन्न


करमाळा प्रतिनिधी: प्रदीपकुमार (आबा) पाटील यांच्या स्मरणार्थ तसेच आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या विद्यमाने स्माईल डेंटल केअर दातांचा दवाखाना यांच्या वतीने दातांच्या कवळी बसविण्यासाठी विशेष सवलतीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर रविवारी (दि. २५ जानेवारी २०२५) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जाधव–पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा येथे पार पडले.
या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५४ रुग्णांनी सहभाग नोंदवला. शिबिरामध्ये दातांच्या कवळींवर ५० टक्के सवलत देण्यात आली. साधारणतः २५ हजार रुपये किंमत असलेल्या कवळी फक्त १२ हजार ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच सर्व रुग्णांची दंत तपासणी पूर्णतः मोफत करण्यात आली.
अनुभवी व तज्ज्ञ दंतवैद्यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक उपचार व योग्य मार्गदर्शन केले. या शिबिरात डॉ. अंशुमान सिंह (B.D.S.), डॉ. प्रविण गायकवाड (M.D.S.), डॉ. सचिन महाबोले (B.D.S.) व डॉ. अजिंक्य वेर्णेकर (M.D.S.) यांनी सेवा दिली. निरोगी दात व सुंदर हास्य मिळविण्याची संधी असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.
यापुढेही समाजहितासाठी अशा प्रकारची आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवानी पाटील, अभिजीत पाटील, अजिंक्य पाटील, तात्यासाहेब जाधव, महादेव भोसले, प्रमोद जगदाळे, राहुल जाधव व शितल पेटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!