राज्याचे गृहराज्यमंत्री मा. शंभूराजे देसाई यांचा 25 जुलै रोजी करमाळा येथे शासकीय दौरा, माजी आमदार नारायण आबा पाटील यांची लव्हे येथे घेणार सात्वंनपर भेट

जेऊर प्रतिनिधी राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय शंभूराजे देसाई यांचा दिनांक 25 जुलै रोजी शासकीय दौरा असल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी किरण गावतुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. राज्याचे गृह (ग्रामीण )वित्त नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय शंभूराजे शिवाजीराव देसाई हे चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथून दिनांक 25 जुलै रोजी दुपारी दीड वाजता शासकीय मोटारीने करमाळा येथे त्यांचे आगमन होणार असून दुपारी दोन वाजता सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेणार असून सव्वादोन वाजता तहसील कार्यालय येथे बैठक असून अडीच वाजता कोविंड बाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक तर लगेच पत्रकार परिषद घेणार आहे. याशिवाय दुपारी चार वाजता शासकीय मोटारीने लव्हे तालुका करमाळा येथे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार असून पाच वाजता शासकीय मोटारीने मंत्री महोदय सातारा येथे रवाना होणार असल्याची माहिती किरण गावतुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
