ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष नरसिंहआप्पा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात १९ एप्रिलला आरोग्य शिबीर किर्तनाचा कार्यक्रम
करमाळा प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष व चिवटे कुटूंबातील ज्येष्ठ नरसिंह (आप्पा) मनोहरपंत चिवटे यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिलला सकाळी १० वाजता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन.अमरनाथ टॉवर, श्रीदेवीचामाळ रोड, करमाळा येथे करण्यात आले आहे
या शिबीरात नेत्ररोग, हृदयरोग, कर्करोग, बालरोग, किडनीचे विकार, महिलांसाठी गर्भपिशवीचा कॅन्सर होऊ नये यासाठी मोफत लसीकरण तसेच सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत मोफत औषध वाटप होणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार नरसिंह आप्पा चिवटे यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी सात वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर माने महाराज, नरसिंहवाडी हेरवाडकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.तरी गरजुंनी या मोफत आरोग्य शिबिराचा कीर्तनाचा लाभ घ्यावा असेआवाहन समस्त चिवटे परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
