Uncategorized

करमाळा बस स्थानकाची स्वच्छता करून अल कुरेश संघटनने जपली सामाजिक बांधिलकी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कुरेशी मोहल्ला मधील अल कुरेश या संघटनेने कोरोनाच्या या संकटकाळात काळात सामाजिक बांधिलकी जपत शहरातील बस स्थानक आज स्वच्छ पाण्याने धुऊन पूर्णता स्वच्छ केल्याने आजच्या समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे.
करमाळा शहरातील एसटी स्टँड परिसरातील कुरेशी मोहल्लामधील अल कुरेश ही तरुण कार्यकर्त्यांची सामाजिक संघटना आहे कोरोना महामारीमुळे व सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने करमाळा बस स्थानिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. यामुळे सध्या बसफेऱ्या तात्पुरत्या बंद केल्या आहे बसफेऱ्या बंद असल्याने सध्या बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते. सदर बाब अल कुरेश या संघटनेने पाहिली असता त्यांनी त्वरित बस स्थानक स्वच्छ पाण्याने धुण्याचा एकमुखी निर्णय घेतला व संघटनेतील सुमारे तीस युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सदरचे बस स्थानक स्वच्छ पाण्याने धुऊन समाजासमोर एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या सामाजिक उपक्रमांमध्ये इसराइल कुरेशी नसरुद्दीन कुरेशी मकसूद कुरेशी अलीम कुरेशी बुडन कुरेशी बबलू कुरेशी सैफ अल कुरेशी जावेद कुरेशी कलीम कुरेशी वसीम कुरेशी अरबाज कुरेशी बादशहा कुरेशी शहानवाज कुरेशी जाकीर कुरेशी तनवीर कुरेशी यासिर कुरेशी अरफत कुरेशी आयान कुरेशी अश्रफ कुरेशी अरमान कुरेशी आसिफ कुरेशी शाहरुख ऊर्फ पापु कुरेशी आरिफ उर्फ छोटू कुरेशी याशिवाय आसिफ पिंजारी व जहीर बागवान या संघटनेतील तरुणांनी एकत्रित येऊन सदरचा सामाजिक उपक्रम राबविला आहे .यावेळी बसस्थानकातील सुरक्षारक्षक सचिन कांबळे सुरेश वाघमारे संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते अल कुरेश या सामाजिक संघटनेच्या या उपक्रमाबद्दल सदर संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजाने याचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group