करमाळा तालुक्यातील ईगल लीप स्कूल मधील क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे ईगल लीप इंग्लिश मीडियम स्कूल करमाळा येथे दिनांक 26/12/22 ते 27/12/22 रोजी स्पोर्ट्स डे अत्यंत आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेक रेस, फ्रॉक जम्प, बॅलन्स ड्रॉइंग बॉल इन बास्केट, लिंबू चमचा अशा प्रकारच्या विविध खेळात भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला यावेळी विद्यार्थी अतिशय खुश होते आणि खेळाचा मनमुराद आनंद त्यांनी लुटला विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये अभ्यास आणि खेळ या दोन्हीचा समतोल साधून यश मिळवावे असे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक महेश दिवेकर यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व सांगितले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक महेश दिवेकर, उपाध्यक्ष डॉक्टर विजय बागल, सचिव पोपट धुमाळ , मुख्याध्यापिका स्वप्नाली दिवेकर, विभाग प्रमुख सचिन पाटील तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन प्रीती शिंदे यांनी केले व आभार स्वप्नाली दिवेकर यांनी मांडले.*
