अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, करमाळा शाखेतर्फे २१ जून रोजी शैक्षणिक साहित्य वाटप – संतोष काका कुलकर्णी
करमाळा, प्रतिनिधी : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) आणि इतर समाज सहाय्य संस्था (नाशिक) केंद्र-करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी १० वाजता शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी दिली.हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर, विकास नगर करमाळा येथे होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संतोष काका कुलकर्णी म्हणाले, “आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देणे ही काळाची गरज आहे.”
या कार्यक्रमात वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी यशकल्याण सेवाभावी संस्था, करमाळाचे अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र नाशिक अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष अनिल देशपांडे आणि कार्यवाह ॲड. सुभाष भणगे उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया असून, कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता आहे,” असेही संतोष काका कुलकर्णी यांनी सांगितले.
कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, सभासद, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच अधिक माहितीसाठी ९४२२४६१५६९ किंवा ९६५७४१५३२८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


