करमाळाकृषी

दहिगाव उपसा सिंचन योजनेचा आवर्तनपूर्व पाहणी दौरा संपन्न

करमाळा प्रतिनिधी
आ.संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार आज दहिगाव व कुंभेज येथील पंप हाऊसची पाहणी कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 चे उपअभियंता अवताडे साहेब, शाखा अभियंता कांबळे साहेब, स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, राष्ट्रवादी पदवीधर चे तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर संजय आवताडे सोहम कांबळे  यांनी केली .
शुक्रवारच्या मीटिंगमध्ये प्रत्येक विभागांनी घेतलेल्या आढावाची वस्तुस्थिती पाहणी केली असता मेकॅनिकल विभागाकडून 70 टक्के कामे झालेली आहे. 30 टक्के कामे अद्याप बाकी आहेत .परंतु इलेक्ट्रिक विभागाची कामे अद्याप बाकी आहेत .बायपास केलेले सॉफ्ट स्टार्टर , टेंपरेचर स्कॅनर ,चार्जिंग साठी असलेल्या बॅटरी, कुलिंग सिस्टीम ही अपूर्ण कामे असल्याचे निदर्शनास आले.
दहीगाव व कुंभेज येथील आवर्तनाला प्रमुख अडथळा ठरणारा कचरा अडविण्यासाठी गेट बसविण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पंपांचा डिस्चार्ज व्यवस्थित मिळू शकेल .तसेच 2014 पासून अद्याप दहीगाव आणि कुंभेज येथे असलेल्या सर्वच्या सर्व 10 पंपांचे सर्विसिंग केलेले नव्हते .त्या पंपांची सर्विसिंग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे .त्यामुळे भविष्य काळामध्ये योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यास निश्चितच मदत होणार आहे.
दहिगाव योजनेच्या शेवटच्या टप्प्यातील गावांना पाणी मिळण्यासाठी अडसर ठरणारी प्रमुख बाब म्हणजे सायफन होय. यासंदर्भातही सिविल विभागाकडून कडक अंमलबजावणी केली जाणार आहे . सायफन द्वारे पाणी उचलणे हा गुन्हा आहे या संदर्भातील जाहीर प्रसिद्धीकरण वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केले जाणार असून सायफन चालविणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कॅनॉलवरती बसविलेले सायफन काढावेत .8 दिवसात असे सायफन न काढल्यास शासन नियमानुसार संबंधितावर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 चे उपअभियंता श्री आवताडे साहेब यांनी दिली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group