कंदरच्या महिला सरपंचाच्या कार्याची दखल राज्यस्तरावर.राज्यातील ११ सरपंचामध्ये मनिषाताई भांगे यांचा समावेश..
करमाळा प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील कंदर या ग्रामपंचायत च्या कार्यतत्पर सरपंच सौ.”मनीषाताई भास्करराव भांगे” ह्या गावातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या घरकुल असो वा ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे व करमाळा तालुक्यातील सरपंचांना येणाऱ्या अडचणींबाबत सतत आवाज उठवत असतात.कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य मोलाचे ठरले आहे.
तालूक्यात सर्वप्रथम स्व खर्चाने कोवीड सेंटर उभा करूण लोंकाचीं सेवा केली याची दखल ही राज्यस्तरावर घेण्यात आली असून राज्यातील ११ आदर्श सरपंचाच्या यादीत सौ.मनीषाताई भांगे यांचा समावेश करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील लेखक-गणेश सानप व संतोष बिनवडे यांनी सरपंच मनीषाताई यांच्या कार्याची दखल घेत राज्यातील टॉप ११ आदर्श सरपंचाच्या कार्यावर पुस्तक लिहले आहे. यांमध्ये करमाळा तालुक्यातील कंदर या गावाने कोरोना काळात केलेल्या कार्याची,शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचविणे,स्वच्छता आणि ग्रामविकास यांसारख्या कार्याचा लेखाजोखा पुस्तकातून राज्यभरातील प्रत्येक सरपंचांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्ग दर्शनाखाली मनीषाताई यांचे काम खुप मोठया प्रमाणात सुरु असून त्याची राज्यात दखल घेतली गेली याच समाधान सरपंच यांना आहे.
कंदर सारख्या मोठ्या गावात 5 वर्षात फक्त 10 %काम बाकीराहिले आहे एवढा बदल सरपंच यांनी आपल्या कार्यकाळात केला आहे जवळ जवळ 5 ते 6 कोटी निधी खर्च करून गावचा सर्वागींन विकास केला आहे.सरपंच या पुस्तकाचे प्रकाशन दि.४ सप्टेंबर २०२२, दुपारी २ वा.पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे जेष्ठ समाजसेवक-बाबा आढाव यांच्या हस्ते होणार आहे.
