प्रा. महेश निकत सर यांना पुणे येथे नालंदा ऑर्गनायझेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी: शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक प्रा.महेश निकत सर यांना नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे येथे प्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे मॅडम, बाबा आमटे यांचे शिष्य सत्यम गुजर सर. डॉक्टर तुळशीराम दाते सर नालंदा ऑर्गनायझेशन चे संस्थापक श्रीकांत जायभाय सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.पुरस्कारांमध्ये मानाचा फेटा ,मेडल,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देण्यात आले.यावेळी हा पुरस्कार ज्यांचे सहकार्य नेहमी लाभते त्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या सर्व शिक्षकांना व इन्स्टिट्यूट वर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी, पालक यांना समर्पित करत आहोत असे प्रा. निकत सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.या अश्या अनेक पुरस्कार मिळवत पुढील काळात अश्या उच्च पुरस्कार मिळतील त्यानुसार पुढील काळात आणखी चागल्यात चांगले कार्य करत राहणार असे निकत सर यांनी सांगितले.
