स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग आयोजित उद्योजक व रोजगार महामेळावा मध्ये संजय सरवदे यांचा सन्मान
पुणे प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग आयोजित उद्योजक व रोजगार महामेळावा मध्ये संजय सरवदे यांना सन्मानित करण्यात आले
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक महाराष्ट्र स्वयंरोजगार विभाग आयोजित उद्योजक व रोजगार महामेळावा पुणे विश्रांतवाडी येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध नामांकित कंपन्यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यावेळी स्वयंरोजगार विभागाने जवळपास पंधराशे उमेदवारांना नोकरी ची संधी उपलब्ध करून दिली .
यावेळी संजय सरवदे यांना पुणे जिल्हा प्रतिनिधी जाधव साहेब व संन्यासी साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ श्रीफळ व *श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सणवार वृत्त वैकल्य*, हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी विजय लोलम साहेब ईश्वर ताकमोगे साहेब राणे साहेब अजित रासनकर साहेब व अनेक मान्यवर व कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
